Vanrakshak Bharti 2025 : राज्यातील स्पर्धा परीक्षा तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी! महाराष्ट्र वनविभागाकडून वनरक्षक पदासाठी तब्बल 12,991 जागांची मेगा भरती लवकरच जाहीर होणार आहे. ही भरती राज्यभरातील विविध विभागांमध्ये होणार असून, इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी आता पासूनच तयारीला सुरुवात करावी. ही भरती प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येणार आहे. अधिकृत माहिती खाली पहा.
◾पदाचे नाव : वनरक्षक (Forest Guard)
◾एकूण पदसंख्या : 12,991 जागा.
◾ शैक्षणिक पात्रता : वनरक्षक पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार इयत्ता १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. काही इतर पदांसाठी (उदा. शिपाई, मदतनीस इत्यादी) दहावी उत्तीर्ण पात्रता लागू शकते.
◾मासिक वेतन : 21,700 ते 69,100 रूपये.
◾विभागनिहाय जागांची तपशीलवार माहिती :
1) नागपूर – १८५२
2) ठाणे – १५६८
3) छत्रपती संभाजीनगर – १५३५
4) गडचिरोली – १४२३
5) अमरावती – ११८८
6) कोल्हापूर – १२८६
7) धुळे – ९३१
8) नाशिक – ८८८
9) चंद्रपूर – ८४५
10) पुणे – ८११
11) यवतमाळ – ६६५
वरील प्रमाणे राज्यातील एकूण १२,९९१ जागा भरल्या जाणार आहेत. हे आकडे वनविभागातर्फे प्राथमिक स्वरूपात निश्चित करण्यात आले आहेत.
◾अर्ज प्रक्रिया : संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाइन माध्यमातून होणार आहे.
◾अन्य संभाव्य पदे :
या भरतीमध्ये सध्या वनरक्षक पदाच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. तथापि, वनविभागातर्फे खालील पदांसाठीही भरती होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे:
1) वनसेवक
2) शिपाई
3) मदतनीस
4) सफाई कामगार
5) प्रिंटर ऑपरेटर
6) रखवालदार
वरील पदांची माहिती अद्याप निश्चित नाही, परंतु यामध्ये लवकरच भरती जाहीर होण्याची शक्यता आहे.
◾अधिकृत माहिती खाली दिली आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
◾शारीरिक पात्रता चाचणी :
1) पुरुष उमेदवारांसाठी – ५ किमी धावण्याची चाचणी.
2) महिला उमेदवारांसाठी – ३ किमी धावण्याची चाचणी.
उमेदवारांनी या शारीरिक चाचणीसाठी नियमित सराव करणे आवश्यक आहे. ही चाचणी भरती प्रक्रियेतील एक महत्त्वपूर्ण टप्पा असतो.
◾महत्त्वाचे मुद्दे :
1) ही भरती राज्यभरातील तरुणांसाठी मोठा रोजगाराचा संधी आहे.
2) उमेदवारांनी योग्य त्या वेळेत आपली कागदपत्रे तयार ठेवावीत.
3) भरतीसंदर्भातील सर्व माहिती वनविभागाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील वनविभागात १२,९९१ वनरक्षक पदांसाठी होणारी ही भरती ही एक सुवर्णसंधी आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक इच्छुक उमेदवारासाठी ही संधी अत्यंत महत्त्वाची आहे. वनसंवर्धन, पर्यावरण रक्षण आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवणाऱ्या तरुणांना शासनाच्या सेवेत येण्याची ही एक उत्तम संधी आहे. उमेदवारांनी वनविभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर नियमित भेट देऊन भरती प्रक्रियेची माहिती अद्ययावत ठेवावी आणि भरतीसाठी आवश्यक त्या तयारीला सुरुवात करावी. योग्य तयारी, शारीरिक सराव आणि सकारात्मक दृष्टिकोन यामुळे आपण निश्चितच यश संपादन करू शकता.