
पुर्ण माहिती | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लीक करा |
वनविभागाद्वारे वनरक्षक पदांसाठी लवकरच मेगा भरती केली जाणार असून त्यात तब्बल १२,९९१ जागा भरल्या जाणार आहेत. त्यात नागपूर विभागात सर्वाधिक १८५२, त्याखालोखाल ठाण्यात १५६८, छत्रपती संभाजीनगरमध्ये १५३५ तर नाशिक विभागात ८८८ जागांवर भरती केली जाणार आहे. भरतीचे वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याची अपेक्षा असून परीक्षार्थीनी त्यासाठी कसून सरावही सुरू केला आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी यंदा आनंदाची वार्ता आहे. विद्यमान वर्षात मोठ्या प्रमाणावर शासकीय पदभरतीसाठी जाहिराती येण्याची शक्यता असून त्यात वनविभाग, पोलिस भरतीचाही दाट शक्यता आहे. त्यापैकी वन विभागात तब्बल १२,९९१ जागांची भरती होणार आहे. यासाठी शैक्षणिक पात्रता इयत्ता बारावी उत्तीर्ण तर काही पदांसाठी इयत्ता दहावी उत्तीर्ण अशी आहे. बोर्डाचे गुणपत्रक, प्रमाणपत्र आणि संबंधित उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असणे अनिवार्य आहे. अधिक माहिती वरती दिलेल्या पेपर कटआऊट मध्ये पहा.