महाराष्ट्र शासन : 10वी / 12वी / पदवीधर उत्तीर्ण उमेदवारांची विधी व न्याय विभाग येथे भरती सुरू! | Vidhi Nyay Vibhag Bharti 2024

Vidhi Nyay Vibhag Bharti 2024 : सरकारी नोकरी शोधताय? 10वी पास व इतर व्यावसायिक पात्रता उत्तीर्ण उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे. विधि व न्याय विभाग मध्ये गट क या संवर्गातील सरळसेवेच्या कोट्यातील नियमित पदभरतीच्या अनुषंगाने पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तरी पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज सादर करायचे आहेत. महाराष्ट्र शासन, विधी व न्याय विभाग व्दारे ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. पात्र व उत्सुक असलेल्या उमेदवारांनी खाली दिलेली जाहिरात अर्ज करण्यापुर्वी वाचून घ्या. पुर्ण PDF जाहिरात व अर्ज खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा
Vidhi Nyay Vibhag Bharti 2024 : Looking for a government job? Candidates who have passed the 10th pass and other professional qualifications have a good opportunity to get a government job. In the Law and Justice Department, applications are being sought from eligible and keen candidates in accordance with regular recruitment of direct service quota in Group C category.

महाराष्ट्र शासनच्या सरकारी विभागात नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
या भरतीची जाहिरात विधि व न्याय विभाग (खुद्द), मंत्रालय, मुंबई द्वारे प्रसिद्ध करण्यात आली आहे.
भरती पदाचे नाव : खाली उपलब्ध असलेली pdf जाहिरात वाचून घ्या.
पगार : या भरती मध्ये निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना 19,900 ते 63,200 रूपये पगार दिला जाणार आहे.
आवश्यक लागणारी शैक्षणिक पात्रता : 10वी उत्तीर्ण. (मूळ pdf जाहिरात वाचावी.)
उमेदवार शारीरिकदृष्ट्या पात्र असणे आवश्यक असून रातांधळेपणा व रंग आंधळेपणा या व्याधींनी ग्रस्त नसावा.
पुर्ण PDF जाहिरात व अर्ज खाली पहा.

PDF जाहिरातयेथे क्लीक करा
अर्ज येथे क्लीक करा
व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

अर्ज सुरू : जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून पुढे अर्ज मागविण्यात आले आहेत.
अर्ज पद्धती : ऑफलाईन (Offline).
वय : ज्या उमेदवारांचे वय 68 वर्ष पर्यंत आहे ते उमेदवार अर्ज करू शकणार आहेत.
पदाचे नाव : वाहनचालक (ड्रायवर)
या भरतीसाठी लागणारी व्यावसायिक पात्रता :
1] माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (10वी उत्तीर्ण) असणे आवश्यक आहे.
2] हलके मोटार वाहन किंवा मध्यम प्रवासी वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालविण्यासाठी परवाना आवश्यक आहे.
3] शासकिय, निमशासकिय किंवा खाजगी संस्थेमध्ये हलके मोटार वाहन किंवा मध्यम, प्रवासी वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालविण्याचा तीन वर्षाहून कमी नाही इतक्या कालावधीचा अनुभव धारण केलेला असणे आवश्यक आहे.
4] मोटार वाहन दुरुस्तीचे जुजबी ज्ञान असणे आवश्यक आहे.
कायमस्वरुपी (Permanent) नोकरी मिळवण्यासाठी चांगली संधी आहे.
मुंबई मध्ये सरकारी नोकरी शोधत असाल तर ही चांगली संधी आहे.
भरायची एकूण पदे : या भरती मध्ये 02 पदे भरण्यात येत आहेत.
संबंधित वाहन चालकास विधि व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई येथे काम करावे लागेल, यानुषंगाने वाहनचालकास संबंधित क्षेत्राची परिपूर्ण भौगोलिक माहिती असणे आवश्यक आहे (मुंबई परिसरात वास्तव्य असलेल्यांना प्राधन्य).
वाहन चालविण्याचा स्वच्छ अभिलेख आहे व चांगली शारीरिक क्षमता असणे आवश्यक आहे.
मराठी, हिंदी भाषा वाचता, बोलता व इंग्रजी भाषा वाचता येणे आवश्यक आहे.
वाहनचालक पदावर नियुक्त होणाऱ्या व्यक्तीने वाहन चालविण्याची चाचणी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील. सदर पदासाठी पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा व मुलाखत घेण्यात येईल.
अर्ज पाठवण्याचा पत्ता : उप सचिव (प्रशासन), ३ रा मजला, विस्तार इमारत, विधी व न्याय विभाग, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२
शेवटची दिनांक : 20 सप्टेंबर 2024.
वरील लेखात माहिती अपूर्ण असू शकते. वरती दिलेले पूर्ण pdf जाहिरात वाचूनच अर्ज करा.


error: Content is protected !!