योजनादूत भरती 2024 : शासन निर्णय (GR) प्रसिद्ध! | Yojanadoot Bharti 2024

Yojanadut Bharti 2024 : महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिध्दी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ पोहचविण्यासाठी राज्यात तब्बल 50,000 पदे भरण्यासाठी GR प्रसिद्ध केला आहे. योजनादूत हे या पदाचे नाव आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिध्दी करणे व त्यांचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी 50,000 योजनादूत पदांची भरती करण्यासाठी “मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम” सुरु करण्यास या शासन निर्णयान्वये मान्यता आली आहे. या भरतीचा शासन निर्णय (GR) खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

महत्वाची माहिती : Yojanadoot Bharti 2024
१) महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आणि मुख्यमंत्री जन-कल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे “मुख्यमंत्री योजनादूत” कार्यक्रम राबविला जाणार आहे. राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्याकरिता मुख्यमंत्री योजनादूत नेमले जातील.
२) ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी १ व शहरी भागात ५००० हजार लोकसंख्येसाठी १ योजनादूत या प्रमाणात एकूण ५० हजार योजनादूतांची निवड करण्यात येईल.
भरतीचा पुर्ण GR (शासन निर्णय) खाली दिला आहे.

व्हॉट्सॲप चॅनेल Follow करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

मुख्यमंत्री योजनादुताच्या निवडीसाठी पात्रतेचे निकष : Yojanadut Bharti 2024
१) वयोमर्यादा १८ ते ३५ वयोगटातील उमेदवार.
२) उमेदवाराकडे अदययावत मोबाईल असणे आवश्यक.
३) उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असणे आवश्यक.
४) उमेदवारांचे आधार कार्ड असावे व त्याच्या नावाचे बँक खाते आधार संलग्न असावे.
भरतीचा पुर्ण GR (शासन निर्णय) खाली दिला आहे.

योजनादूत भरती 2024 : पुर्ण
शासन निर्णय (GR)
पाहण्यासाठी
येथे क्लीक
करा

योजनादूत निवडीसाठी उमेदवाराने सादर करावयाची कागदपत्रे : Yojanadoot Bharti 2024
१) विहित नमुन्यातील “मुख्यमंत्री योजनादूत” कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज.
२) आधारकार्ड.
३) पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्यादाखल कागदपत्रे / प्रमाणपत्र इ. ४) अधिवासाचा दाखला. (सक्षम यंत्रणेने दिलेला)
५) वैयक्तिक बँक खात्याचा तपशिल.
६) पासपोर्ट साईज फोटो.
७) हमीपत्र. (ऑनलाईन अर्जासोबतच्या नमुन्यामधील)

योजनादूताने करावयाची कामे व इतर माहिती :
१) योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील.
२) प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील.
३) योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करतांना ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील.
४) शैक्षणिक अर्हता- उमेदवार कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर.
५) संगणक ज्ञान आवश्यक .
६) मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी १०,००० प्रती महिना एवढे ठोक मानधन देण्यात येईल. (प्रवास खर्च, सर्व भत्ते समावेशित)
७) निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतासोबत ६ महिन्यांचा करार केला जाईल व हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविण्यात येणार नाही.


error: Content is protected !!