योजनादूत भरती 2024 : पुर्ण शासन निर्णय (GR) पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार, प्रसिध्दी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकापर्यंत पोहोचविणे यासाठी महाराष्ट्र शासन व्दारे तब्बल 50,000 पदांची भरती जाहीर केली आहे. योजनादूत असे पदाचे नाव आहे. ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी 1 तर शहरी भागात 5000 हजार लोकसंख्येसाठी 1 योजनादूत यांची भरती केली जाणार आहे.
या भरतीसाठी 18 ते 35 वर्ष वय असलेले उमेदवार अर्ज करू शकतील. तसेच या भरतीसाठी अर्ज करणारा उमेदवार हा महाराष्ट्र रहिवासी असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. भरतीला अजून सुरुवात झाली नाहीये. शैक्षणिक अर्हता ही उमेदवार कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवाराला संगणक ज्ञान आवश्यक आहे. या भरती विषयी अधिक माहितीसाठी वरती दिलेला शासन निर्णय (GR) वाचून घ्या.