PDF जाहिरात | येथे क्लीक करा |
नमूना अर्ज | येथे क्लीक करा |
मोठ्या भरतीची वाट पाहणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे..जिल्हा परिषद पालघर अंतर्गत तब्बल 1891 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये कंत्राटी शिक्षक ही पदे भरली जाणार आहेत. जे उमेदवार पालघर (Jobs in Palghar) मध्ये नोकरी शोधत असतील त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. निवड करण्यात आलेल्या उमेदवारांना मासिक वेतन/ मानधन 20,000/- रूपये पर्यंत दिले जाणार आहे. या भरतीसाठी अर्ज करण्याची पद्धत ही ऑफलाईन (Offline) आहे.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी आवेदन पत्र शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद पालघर (दालन क्र. १७) या कार्यालयात दि.२३/०८/२०२४ रोजीपर्यंत सादर करावे. यानंतर आलेले आवेदन पत्र स्वीकारले जाणार नाहीत. शासनाद्वारे नियमित शिक्षक उपलब्ध झाल्यास कंत्राटी पद्धतीने शिक्षक पदी नियुक्ती देण्यात आलेल्या उमेदवारांची तात्काळ सेवा समाप्त करण्यात येईल. या भरतीची विस्तृत जाहिरात, अर्जाचे नमुने व इतर प्रारूप www.zppalghar.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे.
विहित मुदतीनंतर या कार्यालयास प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी, तसेच या कार्यालयास प्राप्त झालेल्या अर्जामधून पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी जिल्हा परिषदेच्या अधिकृत वेबसाईट प्रसिद्ध करण्यात येईल. 23 ऑगस्ट 2024 ही अर्ज मागविण्याची शेवटची तारीख आहे. अर्ज स्विकारण्याचा पत्ता – (प्राथमिक), जि. प. पालघर, नवीन जिल्हा परिषद इमारत, दालन क्रमांक-१७, कोळगाव, पालघर बोईसर रोड, पालघर (प.). या भरती संदर्भात अधिक माहितीसाठी वरती दिलेली PDF जाहिरात वाचून घ्या.