ZP Bharti 2023 : 15 वित्त आयोगा अंतर्गत जिल्हा परिषद, औरंगाबाद स्तरावरील भेट मुलाखतीव्दारे नवीन पदांची भरती जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे ही तुमच्यासाठी चांगली संधी आहे. सर्व सुचनांचे काळजी पूर्वक वाचन करून अर्ज विहित कलेल्या पध्दती नुसारच अर्ज सादर करावा अर्जामध्ये दिलेल्या नमुद माहितीच्या आधारे व मुलाखती दरम्यान सादर केलेल्या प्रमाणपत्रांच्या / कागदपत्रांच्या आधारे उमेदवार पात्र व अपात्र ठरविण्यात येईल व त्या आधारे त्याचा समावेश पुढील निवड प्रक्रियेत करण्यात येईल. अर्ज स्विकारण्यात आला किंवा पुढील निवड प्रक्रियेत समावेश करण्यात आला म्हणजे उमेदवाराची निवड झाली असा होणार नाही. निवड प्रक्रिये दरम्याण कोणत्याही वेळी किंवा उमेदवारांच्या निवडी नंतर अर्जदार विहित अर्हता धारण करीत नसल्याने किंवा कोणत्याही कारणास्तव अपात्र ठरत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा उमेदवाराची उमेदवारी / निवड तात्काळ रद्द करण्यात येईल.
ZP Recruitment 2023 : New has been announced to fill the vacant posts under Zilla Parishad. The recruitment advertisement has been published by the Health Department. Candidates should read the below advertisement carefully before applying. Vacancies in advertisement, other necessary information about it, and detailed advertisement are given below.
◾उमेदवारांना सूचना :
1. सर्व उमेदवारांनी जाहिरातीत नमूद अर्ज विहित कालावधीत भरणे आवश्यक आहे. अर्जात दिलेल्या प्रत्येक मुद्याची माहिती अचुक भरावी. एकदा भरलेली माहिती अंतिम समजण्यात येइल व त्यात कोणताही बदल करता येणार नाही याची नोंद घ्यावी.
2. सोबत जोडलेला अर्जसोबत शैक्षणिक पात्रतेच्या छायांकित ज्या प्रर्वगात अर्ज केले आहे त्या प्रर्वगाचे जात प्रमाणपत्र, अनुभव असल्यास अनुभवाचे प्रमाणपत्र व धनाकर्ष व्यतिरिक्त इतर कागदपत्र जोडु नयेत. 3. एका पदाकरीता एकच अर्ज भरणे आवश्यक आहे. एका पेक्षा अधिक पदांकरीता स्वतंत्र अर्ज भरणे आवश्यक आहे तसेच प्रत्येक पदांकरीता अर्ज शुल्कांचा स्वतंत्र धनाकर्ष जोडणे आवश्यक आहे.
3) वयोमर्यादा : वैद्यकीय कंत्राटी सेवेकरीता कमाल वयोमर्यादा व सेवा समाप्तीचे वय ७० वर्ष राहील. तसेच शारीरिक व मानसिक दृष्टया सक्षम असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील, त्यानंतरच सेवा सुरु करण्याबाबतचे आदेश देण्यात येईल. इतर सेवाकरिता खुल्या प्रवर्गासाठी ३८ वर्ष व मागासवर्गीय प्रवर्गासाठी ४३ वर्ष कमाल वर्यामर्यादा राहील. राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये कार्यरत असल्यास ५ वर्षे वयाची अट शिथिल राहील.
4) अटी व शर्ती : सदर सेवा ही निव्वळ कंत्राटी स्वरूपाची असून दि. २९/०६/२०२३ पर्यतच घेतली जाईल, तसेच केंद्र शासनाने नामंजूर केल्यास कोणतीही पुर्वसुचना न देता उमेदवारांची सेवा समाप्त करण्यात येईल. 2. अर्जदार हा संबंधित पदासाठी शारिरीक व मानसीक दृष्टया सक्षम असावा, तसेच अर्जदारा विरुद्ध कोणताही फौजदारी गुन्हा दाखला झालेला नसावा. 3. वरील तक्त्यातील कंत्राटी सेवेकरीता निवड प्रक्रीया ही प्राप्त अर्जाचे संख्येनुसार अर्जाची छाननी करून पात्र उमेदवारांची गुणवत्तेनुसार आवश्यकते प्रमाणे एका जागेसाठी पाच या पध्दतीचा अवलंब करून कौशल्य चाचणी व तोंडी मुलाखत घेऊन गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल. पात्र व अपात्र उमेदवारांची यादी व इतर माहिती http://www.zpaurangabad.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल. उमेदवारांशी कोणत्याही प्रकारचा पत्र व्यवहार करण्यात येणार नाही.
5. अर्जदाराने एका पेक्षा जास्त सेवा अर्ज करायचा असल्यास स्वतंत्र अर्ज करावा व अर्जासोबत जोडण्यात आलेल्या डिमांड ड्राफ्ट (Demand Draft) धनाकर्षाची रक्कम परत केली जाणार नाही या अटीवर उमेदवाराने अर्ज करावा.
◾भरती पदाचे नाव: वैद्यकीय अधिकारी.
◾भरायची एकूण पदे : 014 पदे.
◾अर्ज शुल्क: खुला प्रवर्ग – रु.200/-, मागासवर्गीय प्रवर्ग – रु.100/-
◾नोकरी ठिकाण: औरंगाबाद.
◾आवेदन का तरीका: ऑफलाईन.
◾निवड प्रक्रिया: मुलाखत.
◾मुलाखतीची तारीख: 28 एप्रिल 2023.
◾मुलाखतीची पत्ता: वेरुळ सभागृह, जिल्हा परिषद औरंगाबाद.
अर्ज | येथे क्लीक करा |
वेबसाईट | येथे क्लीक करा |
टेलिग्राम ग्रुप | येथे क्लीक करा |
महत्वाची माहिती :
◾अर्जदाराने A4 आकाराच्या कोन्या कागदावर अर्ज करावयाचा असून त्यामध्ये खालील बाबी अतंर्भूत असाव्यात :
1. अर्जामध्ये ठळक अक्षरात स्वतःचे नांव, कंत्राटी सेवेचे नांव कायमस्वरूपी राहत असलेला पत्ता, दुरध्वनी व भ्रमणध्वनी क्रमांक Email Id जन्मतारीख, शैक्षणीक अर्हतेचे सर्व तपशील अभ्यासक्रमाचे नाव, संस्था, बोर्ड / विद्यापीठाचे नांव, उत्तीर्ण झालेले वर्ष, गुणांची टक्केवारी, कामाचा अनुभव काम केलेल्या शासकीय / निमशासकीय संस्था / रुग्णालयाचे नांव ज्या पदावर काम केलेले आहे त्या पदाचे नांव कालावधी, पदाची जबाबदारी व मानधन / वेतन, तसेच इतर सर्व माहिती नमुद करावी.
2. अर्जासोबत स्वसांक्षाकित असलेले एस.एस.सी., एच.एस. सी. गुणपत्रिका व प्रमाणपत्र, शाळेचा दाखला, पदवी गुणपत्रीका व प्रमाणपत्र, पदव्युत्तर पदवी गुणपत्रिका, अनुभव प्रमाणपत्र व प्रमाणपत्र, आधार कार्ड / मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचे १ फोटो, जातीचे प्रमाणपत्र / जात वैधता प्रमाणपत्र सोबत जोडण्यात यावे.
3. विशेषतज्ञांनी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी संबधीत कौन्सिलकडे नोंदणी केलेले प्रमाणपत्र व अद्यावत पुर्ननोंदणी प्रमाणपत्र जोडणे बंधनकारक राहील अन्यथा सदर उमेदवारास अपात्र ठरविण्यात येईल. 4. याप्रमाणे अर्जासोबत सर्व स्वसाक्षांकित प्रमाणपत्रे जोडून तक्त्यामध्ये नमुद असलेल्या सेवेच्या नावासमोरील नमुद कार्यालयाच्या ठिकाणी मा. अध्यक्ष, निवड समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जि. प. औरंगाबाद यांचे नावाने सादर करावा.
◾शैक्षणिक आर्हता / पात्रता :
1. शैक्षणिक अर्हतेबाबतचा सविस्तर व अचुक तपशील नोंद करावा.
2. अर्ज सादर करावयाच्या शेवटच्या तारखेला उमेदवाराकडे जाहिरातीमध्ये नमुद शैक्षणिक अर्हता धारण: केलेली असणे आवश्यक आहे.
3. शैक्षणिक अर्हता ज्या तारखेस प्राप्त केली आहे ती तारीख अर्जात नमूद करणे आवयश्यक आहे (निकाल घोषित झालेली तारीख)
4. अर्ज भरत असतांना अंतिम वर्षाच्या मिळालल्या गुणांची टक्केवारी अचूकपणे नमूद करावी. ग्रेड अथवा अन्य श्रेणी नमूद न करता गुणांची टक्केवारी नमूद करणे अनिवार्य आहे. प्रमाणपत्रात नमूद गुणांची टक्केवारी व अर्जात नमूद टक्केवारी न जुळल्यास असे अर्ज नामंजुर करण्यात येतील.
5. अंतिम प्रमाणपत्रामध्ये ग्रेड अथवा श्रेणी नमूद असल्यास संबंधित संस्थेकडुन त्याचे गुणांमध्ये रुपांतर करुण ते संबंधित संस्थेकडुन प्रमाणित करून घ्यावे. मुलाखतीच्या वेळी ती सादर करावी. 6. उमेदवारांची अर्जामध्ये नमूद माहिती नुसार अर्जाची छाननी करण्यात येईल.
7. पात्र उमेदवारांनी अर्जात नमूद केलेल्या सर्व शैक्षणिक अर्हते बाबतची सर्व प्रमाणपत्र कागदपत्रे मुलाखतीच्या वेळी एक प्रत या कर्यालयास सादर करणे अनिवार्य राहील.
8. पात्र उमेदवारांनी मुलाखतीच्या दरम्यान आवश्यक शैक्षणिक अर्हतेच्या गुणपत्रिका न जोडल्यास सदरील उमेदवारांना अपात्र ठरविले जाईल.
9. पदाकरीता आवश्यक शैक्षणिक अर्हता / पात्रता ही शासकीय मान्यताप्राप्त विदयापीठातून प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे.
◾अनुभव
1. शैक्षणिक आर्हता व आवश्यक अतिरीक्त शैक्षणिक अर्हता प्राप्त केल्यानंतरचा अनुभव ग्राहय धरण्यात येईल. त्यानुसार शैक्षणिक अर्हता धारण करण्यापूर्वीच्या अनुभवांची नोंद करण्यात येऊ नये. त्या अनुभवाची परिगणना करण्यात येणार नाही.
2. अनुभवाचा तपशील नमूद करतांना पहिली नियुक्तीचा कालावधी ते सध्याचा नियुक्ती कालावधी क्रमानेच यावा.
3. अनुभवाचा तपशील नमूद करीत असतांना ज्या कार्यालयाचे अनुभव प्रमाणपत्र प्राप्त आहे. अशाच कार्यालयाचा तपशील अर्जामध्ये नमूद कारवा अनुभव प्रमाणपत्र नसल्यास सदरचा अनुभव ग्राहय धरण्यात येणार नाही. अनुभव प्रमाणपत्रामध्ये अनुभवाचा कालावधी सुस्पष्टपणे नमूद असावा. अर्ज शुल्क उमेदवारास अर्जासोबत अर्ज शुल्काचा धनाकर्ष जोडणे आवश्यक आहे. खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु. २००/- व राखीव प्रवर्गातील उमेदवारांकरीता रु.१००/- रकमेचा धनाकर्ष (डिमांड ड्राफ्ट) अर्ज शुल्क असेल, धनाकर्ष पुढील नावे काढावा.
◾निवड प्रक्रिया :
1. सदर पदभरतीच्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या अर्जाच्या संख्येनुसार निवड प्रक्रिया केवळ गुणांकन मुलाखतीद्वारे किंवा लेखी व मुलाखतीद्वारे ठरविण्याचे सर्व अधिकार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, औरंगाबाद यांच्याकडे राखून ठेवले आहेत.
2. अर्जाच्या संख्येनुसार उमेदवारांची लेखी परीक्षा घेण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.
3. लेखी परीक्षा घ्यावयाची झाल्यास त्याबाबत संबंधित सुचना यथावकाश निर्गमित करण्यात येतील.
4. मुलाखतीद्वारे निवड करावयाची असल्यास मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मान्यतेने निकष लावून १३ ते १५ उमेदवारांची निवड मुलाखतीसाठी करण्यात येईल. मुलाखतीने उमेदवार निवडताना उमेदवाराचे गुणांकन पदवी परीक्षेतील अंतिम वर्षाचे गुण, अतिरिक्त शैक्षणीक अर्हता, अनुभव आणि आवश्यकतेनुसार मुलाखत घेऊन खालील तक्त्यानुसार गुणांकन करण्यात येईल.
◾ सर्वसाधारण सूचना :
1. सदर पदभरती प्रक्रियेबाबतच्या सर्व आवश्यक सुचना व माहिती आरोग्य विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावरच वेळोवेळी प्रसिध्द करण्यात येईल. या करीता उमेदवारांनी www.zpaurangabad.gov.in या संकेतस्थळास भेट देऊन माहिती प्राप्त करून घेणे अनिवार्य राहील. पदभरतीच्या अनुषंगाने कोणत्याही उमेदवारास वैयक्तिक संपर्क साधण्यात येणार नाही.
2. जहिरातीत नमूद केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत बदल होण्याच्या संभव आहे.
3. जाहीरातीत नमुद केलेली पदे ही पुर्णतः कंत्राटी स्वरुपाची असून ती राज्य शासनाची नियमित पदे नाहीत या पदांचा राज्य शासनाच्या पदांशी काहीही संबंध नसून उमेदवार राज्य शासनाच्या नियमित पदावर समायोजन करण्याची मागणी करु शकणार नाही.
4. जाहीरातीत नमुद केलेली पदाचे मानधन हे एकत्रित मानधन आहे. 5. सदर पदभरती प्रक्रियेत आवश्यकतेनुसार बदल करण्याचे तसेच सदर पदभरती अंशतः किंवा पूर्ण रद्द करण्याचे अधिकार मा. मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद, औरंगाबाद, यांनी राखून ठेवले आहेत.
◾टिप :
1. अर्जात नमुद केलेल्या माहितीनुसार मुलाखतीस पात्र / अपात्र उमेदवारांची यादी या कार्यालयाच्या www.zpaurangabad.gov.in संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.
2. जे उमेदवार मुलाखतीच्या वेळी मुळ कागदपत्रे व स्वसाक्षांकीत कागदपत्राची प्रत कार्यालयास सादर करणार नाहीत ते उमेदवार मुलाखतीस पात्र राहणार नाहीत याची कृपया नोंद घेण्यात यावी.