जिल्हा परिषद अंतर्गत नवीन पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध! | मासिक वेतन : 35,000 रूपये.

पुर्ण जाहिरात येथे क्लीक करा
नमूना अर्जयेथे क्लीक करा

जिल्हा परिषद यवतमाळ, सामान्य प्रशासन विभाग व्दारे वकील आणि कायदा सल्लागार ही पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण 16 पदे भरण्यासाठी ही भरती जाहिरात प्रसिद्ध केली आहे. शैक्षणिक पात्रता एल.एल.बी. उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी पात्र ठरतील. अर्ज करण्याची पद्धत ही या भरतीसाठी ऑफलाईन (Offline) ही असणार आहे. उमेदवारांची निवड ही मुलाखत व्दारे केली जाणार आहे. मुलाखतीची तारीख ही 23 जुलै 2024 ही आहे.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

नियम व अटी : आवक जावक शाखा, जि.प. यवतमाळ मार्फत विधी शाखेस प्राप्त होणारी सर्व न्यायालयीन प्रकरणांची नोंदवहीमध्ये नोंद करून स्विकारणे बंधनकारक राहिल. त्याप्रमाणे संबंधीत विभागाकडुन / शाखेकडुन माहिती प्राप्त करुन, न्यायालयीन प्रकरणे निकाली काढावी लागेल. रूजू होण्यापूर्वी रू. 100/- च्या स्टॅम्प पेपरवर करारनामा करून देणे बंधनकारक राहिल. नेमणूकीच्या ठिकाणी रूजू होण्याकरिता प्रवास भत्ता अनुज्ञेय राहणार नाही. नेमणूक आदेश मिळाल्यापासून 7 दिवसाच्या आंत रूजू व्हावे, विहित कालावधीत रूजू न झाल्यास उक्त पदावर नेमणूक मिळण्याचा हक्क संपुष्टात येईल. विधी सल्लागार या पदावरील नियुक्ती 11 महिण्याच्या कालावधीकरिता असुन, जास्तीत जास्त पुढील 3 वर्षापर्यंत मुदतवाढ देता येईल.

व्हॉट्सॲप ग्रुप येथे क्लीक करा
टेलिग्राम ग्रुप येथे क्लीक करा

विधी सल्लागार या पदावरील सेवेकरिता मुदतवाढ देणे किंवा सेवा संपुष्टात आणण्याचे, तसेच आदेशात बदल करण्याचे सर्वाधिकार मुख्य कार्यकारी अधिकारी यांना राहील. जिल्हा स्तरावरील व तालुका स्तरावरील तसेच उच्च न्यायालय नागपुर औरंगाबाद तसेच सर्वोच्च न्यायालयाकरीता स्वतंत्रपणे अर्ज करणे बंधनकारक राहील वकील पॅनल नियुक्ती अर्जाचा नमुना, अटी व शर्ती www.zpyavatmal.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध राहील. या भरतीसाठी अर्ज सादर करण्याचा पत्ता हा उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र.) सामान्य प्रशासन विभाग, जिल्हा परिषद प्रशासकीय ईमारत पहिला माळा, आर्णी रोड, जिल्हा परिषद यवतमाळ ४४५००१ हा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 जुलै 2024.


error: Content is protected !!