पुर्ण जाहिरात | येथे क्लीक करा |
अधिकृत वेबसाईट |
जिल्हा परिषद पुणे, बांधकाम विभाग उत्तर मध्ये रिक्त असलेली पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या भरती मध्ये सेवानिवृत्त शाखा अभियंता / सहाय्यक अभियंता श्रेणी – २ ही एकूण 03 पदे भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पुणे मध्ये नोकरी मिळवायची चांगली संधी आहे. या भरतीसाठी उमेदवाराचे वय ६५ पेक्षा अधिक नसावे. या भरतीसाठी तुम्ही ऑफलाईन (Offline) पद्धतीनें अर्ज करू शकतात. नियम व अटी : उमेदवाराने जाहिरातील नमूद केल्याप्रमाणे पात्रताधारक असल्याचे खात्री करुनच अर्ज करणे आवश्यक राहील, अर्जात चुकीची माहिती किंवा अपूर्ण नोंदी असल्यास व उमेदवार योग्य पात्रताधारक नसल्याचे आढळून आल्यास त्याची निवड रद्द करण्यात येईल.
आपली कंत्राटी शाखा अभियंता सहाय्यक अभियंता श्रेणी २ या पदावर निवड झालेनंतर आपले विरुध्द कोणत्याही प्रकारची पोलीस केस अथवा न्यायालयीन केस प्रलंबित नसलेचा चारित्र्य पडताळणी दाखला आपले नजिकचे पोलिस स्टेशनवरुन आणून देणे बंधनकारक असेल. खाते निहाय चौकशी सुरु नसलेचा व कोर्ट केस नसलेचा दाखला सादर करणे आवश्यक राहील. श्रेत्रीय स्तरावर करार पध्दतीने नेमणूक दिलेल्या कंत्राटी शाखा अभियंता सहाय्यक अभियंता श्रेणी २ यांना सेवाकालामध्ये काही नैसर्गिक अपधात व काही आजार उद्भवल्यास कार्यालय/शासन कोणत्याही प्रकारची भरपाई देणार नाही व बांधील राहणार नाही. कंत्राटी शाखा अभियंता सहाय्यक अभियंता श्रेणी २ यांना सेवा काळामध्ये अनुज्ञेय मानधन व इतर भत्ते शासननिर्णय/नियमांस अधिन राहून अदा करणेत येतील.
करारनामा कालावधीमध्ये नियुक्तीचे ठिकाणी वास्तव्य करणे बंधनकारक राहील. कंत्राटी शाखा अभियंता सहाय्यक अभियंता श्रेणी-२ यांचेवर शासनकडील आवश्यक ते निर्णय / नियम व वेळोवळी निर्गमित होणारे शासन निर्णय बंधनकारक राहतील. अर्ज अंतिम तारीख पर्यंत बांधकाम विभाग उत्तर, जिल्हा परिषद पुणे येथे पोहोचतील असे पहावे, त्यानंतर आलेल्या विचार केला जाणार नाही. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 11 डिसेंबर 2024 ही आहे. तर अर्ज पाठवण्याचा पत्ता / अर्ज सादर करण्याचा पत्ता: बांधकाम विभाग उत्तर, जिल्हा परिषद पुणे. अधिक माहितीसाठी वरती दिलेली pdf जाहिरात पहा.